"अवतरण अकादमी" हा 'कलाविष्काराच्या अवतरण्याचा मंच' आहे. कलानंद देणे घेणे हा केवळ मनुष्यप्राण्याचा गुण असल्यामुळे कलोपासना हा माणसाचे माणूसपण दृढ राखणारा एकमेव आचार आहे, ह्या विश्वासाने 'अवतरण' हा मंच बारा वर्षापूर्वी सुरु झाला. मानवी विकासाच्या मार्गावर 'कलानिर्मितीचे महत्व' जनमनात रुजविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे; तसेच नवोदिताना रंगमंच उपलब्ध करून देणे, ह्या हेतूने सद्या 'नाटक' ह्या प्रयोगजीवी कलेचा अभ्यास, लेखन, अभिनय ह्याचा सराव, सादरीकरण, असे काम सुरु आहे. काव्यरचना- कार्यशाळा, कथालेखन- कार्यशाळा, पटकथा व संवाद लेखन-कार्यशाळा असे अनेक उपक्रम आहेत. इच्छुकांनी जरूर संपर्क साधावा.
संभाजी सावंत
०९८६९४५३७००
sambhajipsawant@gmail.com